#तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी पदभार स्विकारला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीवर पुन्हा प्रशासक नेमण्यात आल्याने खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी नगरपंचायतीचा प्रशासकीय कारभार स्विकारला.
नकुताच दिनाक ५ डिसेंबर रोजी खानापूर नगरपंचातीच्या नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला.
त्यामुळे नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवटीची आमलबजावणी पुन्हा करण्यात आली.
राजपालांच्या आदेशा नुसार नगर विकास विभागाचे सचीव टी मंजुनाथ यांच्या आदेशा नुसार खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार याची प्रशासक म्हणून नियुक्ति करण्यात आली.त्यानिमित्त त्यानी प्रशासक म्हणून पदभार स्विकारला.
या वेळी खानापूर नगरपंचातीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट, इंजिनियर तिरुपति राठोड, तसेच प्रेमानंद नाईक यानी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
