संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिवठाण (ता. खानापूर ) येथील श्री चांगळेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्याना लोंढा वन विभाग व कर्नाटक सरकारच्या चिन्नर दर्शन अंतर्गत करंबळ ट्री पार्क ,राणी प्राणी संग्रहालय व हेम्माडगा सदाहरीत जंगलात शैक्षणिक भेट देण्यात आली. विद्यार्थ्यानी जैवविविधता लायकेन , शेवाळ, सदाहरीत जंगलाची वैशिष्ठे व वन्य प्राणाच्या पाऊल खूणांचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
तसेच लोंढा नर्सरीमध्ये रोपलागवड प्रक्रिया जाणुन घेतली.त्याचबरोबर गुंजी येथील जिल्ह्यातील एकमेव टिंबर डेपो पाहुन विविध जंगली लाकडांची माहिती मिळविली.त्यातुनच विद्यार्थ्याना पर्यावरण विषयक ज्ञान मिळाले.
या वेळी शिवठाण हायस्कूलचे मुख्याध्यापक , सहशिक्षक तसेच विद्यार्थी व वनविभागाचे आर एफ ओ नंदपगोळ, महादेवाप्पा, मल्लापा आधी उपस्थित होते .
