#काँम्रेड किशोर ढमाले व प्रा.प्रतिमा परदेशी याने पुरस्काराने सन्मानित!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील शिव स्मारक चौकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात गुरूवारी दि. ४ रोजी राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहास संशोधक डाॅ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.
व्यासपिठावर पुरस्काराचे मानकरी काॅम्रेड किशोर ढमाले व प्रा.प्रतिमा परदेशी तसेच राजाभाऊ पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, म ए.समितीचे नेते प्रकाश मरगाळे ,श्रीमती मंजूश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होत्.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
या वेळी पुरस्काराचा हेतू निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यानी स्पष्ट केला.तर प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत राजाभाऊ पाटील यानी केले.तर मंजुश्री पवार यानी सत्कार मुर्तीचा परिचय करून दिला.
या वेळी राष्टवीरकार शामराव देसाई पुरस्कार क्राॅम्रेड किशोर ढमाले व प्रा प्रतिमा परदेसी याना अध्यक्ष डाँ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते मान चिन्ह , घोंगडी ,पुष्पहार व रोख २५ हजार रूपये देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना काँम्रेड किशोर ढमाले म्हणाले की, राष्टवीरकार शामराव देसाई यानी खडोपाडी जाऊन शिक्षणाची गंगा आणली.त्यामुळे आज सर्व सामान्याना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.म्हणून आज बहुजन समाजातील युवक शिक्षित झाला.जर शामराव देसाई यानी हे केले नसते तर आमचा समाज आडाणी राहिलाअसता.हे त्याचे ऋण आहेत.
असे मत व्यक्त केले.
या वेळी प्रा. प्रतिमा परदेसी यानी ही आपले विचार व्यक्त केले.व पुरस्कार देऊन आमचा सत्कार केल्याबदल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यानी केले.,तर आभार मा जी आमदार दिगंबर पाटील यानी मानले.
