” कला कौस्तुभ संस्था दांडेली यांच्यावतीने कित्तूर येथील राजगुरू संस्थान कलमठ सभागृहात आयोजन”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप ( ता. खानापूर ) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ. एल.डी.नलवडी याना कला कौस्तुभ संस्था दांडेली यांच्यावतीने देण्यात येणारा वीर राणी चन्नमा पुरस्कार रविवारी दि.३० नोव्हेबर रोजी कित्तूर येथील राजगुरू संस्थान कलमठ सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते देण्यात आला.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक डाॅ.अजनाळ भीमाशंकर उपस्थित होते.
व्यासपिठावर फिरोज फिरजादे,नगरसेविका मिनीक्षी सुरेश भागी,अब्दुल रहिमान,डॉ.चंद्रशेखर हलसगी,गोविंद के. मलगेरी आदी उपस्थित होते.
या वेळी प्रास्ताविक व उपस्थिताचे स्वागत कला कौस्तुभ संस्थेचे अध्यक्ष गोविंद मलगेरी यानी केले.
तर कार्यक्रमाची सुरूवात वीर राणी चन्नमा प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचेऔचित्य साधुन कवी सम्मेलन पार पडले.,यावेळी चंद्रशेखऱ, रेष्मा कोळी, लक्ष्मी पाटील ,अब्दूल रहिमान,बी.बी.काद्रोळी , शिक्षिका सौ.,के.,ममता, आदीनी कविता सादर केल्या.
यावेळी सिंगीनकोप ( ता.खानापूर,) मराठी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ.एल.डी.नलवडी याना वीर राणी चन्नमा प्रशती ,मान चिन्ह, शाल,पुष्पहार घालुन मान्य़वरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी मान्यवराची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीष शिरोडकर यानी केले. तर आभार शिक्षिका सौ. ममता यानी मानले.
का्र्यक्रमाला खानापूर ,,कित्तूर, बेळगाव तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.तसेच समाज सेवक,शिक्षणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंगीनकोप शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ.एल. डी. नलवडी याना वीर राणी चन्नमा पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्यावतीने व गावकर्याच्यावतीने अभिनंदन केले.
,

