चि.सौ.कां.वैष्णवी हिचाशुभविवाह चि.अनंत
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी (ता .खानापूर) येथील प्राथमिक शिक्षक व श्री महालक्ष्मी ग्रुप संचालक श्री महादेव गोविंद बांदिवडेकर यांची कन्या चि. सौ. का. वैष्णवी हिचा शुभविवाह चि. अनंत
(श्रीकांत अनंत सोनार मु. गडहिंग्लज जि.कोल्हापूर.) यांचे चिरंजीव यांच्याशी गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून सात मिनिटांनी पारिशवा रोड खानापूर येथील नागंन्ना होसमनी कन्वेशन हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.