संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिंनकट्टी (ता. खानापूर) गावचे रहिवासी व श्री महालक्ष्मी पी के पी एस संघाचे विद्यमान अध्यक्ष व श्री महालक्ष्मी ग्रुपचे जेष्ठ सल्लागार तसेच महालक्ष्मी हायस्कूलचे संचालक गंगाराम गोविंद बांदिवडेकर (वय 74 ) यांचे गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
तालुका पंचायतीच्या माजी सभापती कै. कावेरी बांदिवडेकर यांचे ते पती होत.
त्यांच्या पश्चात चार भाऊ, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी रात्री आठ वाजता तोपिनकट्टी येथे होणार आहेत.