संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्यातील देगावचे युवा नेते आनंद बुद्धाप्पा गावडे यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल यांनी वाढदिवसानिमित्त आनंद गावडे यांचा शाल, पुष्पहार व पेढे भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,
तालुक्याच्या अतिदुर्गम जंगल भागात शिक्षणाची सोय नसल्याने केवळ इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण घेता आले. शिक्षणाची इच्छा असून शिक्षण घेता आले नाही. पुढील शिक्षणावर पाणी सोडून त्यांनी बालवयातच गोव्याला कामाच्या शोधात जावे लागले.
परंतु देगाव गावची आठवण त्याना तसी शांत बसू देत नव्हती. काही वर्षांनंतर पुन्हा ते देगावला येऊन देगावच्या समाजकार्यात सहभागी झाले. देगावच्या समाजकार्याबरोबर गेली 20ते 22 वर्षे भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आज तगायत देगाव परिसरात कार्यरत आहेत.खानापूर तालुक्याच्या दुर्गम अशा जंगल व मागासलेल्या देगाव सारख्या खेड्यात परिसरात समाजसेवेसाठी वाहून घेतले. देगाव परीसरात कोणते संकट येऊ दे. कोणतेही कार्य असुदे ते जातीने पुढे जाऊन ते काम यशस्वी पार पडण्यास नेहमी अग्रेसर असतात.
देगाव गावच्या शैक्षणिक समस्या तसेच गावच्या विकासाबद्दलच्या समस्या यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील कुठेही क्रिकेट स्पर्धा असो. ते जातीने उपस्थित असतात. कुणाचेही हॉस्पिटलचे काम असो मग रात्र असो दिवस असो हकेला धावून जाणारे असे हे नेते आहेत.
त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.
वाढदिवसानिमित्त फोंडा तालुक्याचे नगराध्यक्ष व भाजपचे नेते दळवी यांनीही आनंद गावडे यांना शुभेच्छा देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी खानापूर तालुक्यातील अनेक भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी आनंद गावडे यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.