संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नुकत्याच हसन येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धेत बेळगाव विभागीय संघ उपविजेता ठरला असून हसन या संघाविरुद्ध अंतिम सामन्यात ताराराणी या संघाला उपविजेता पद मिळविले आहे.
मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूल हाॅकी संघाच्या दोन अव्वल दर्जाच्या खेळाडूंची या विभागीय संघामधून राज्यपातळीवर निवड झाली.
काउंटर अटॅक, डिफेन्स, काउंटर मुव्हचे जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या विभागीय संघातील कुमारी सानिका मनोहर पाटील आणि श्रेया पाटील नेहमीच हाॅकी प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेत होत्या .
सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रतिभावंत खेळाडू कुमारी सानिका मनोहर पाटील हिच्या अष्टपैलू खेळामुळे तिची आता निर्विवादपणे राष्ट्रीय पातळीवर वर्णी लागली आहे .
मराठा मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर. राजश्रीताई नागराजू यादव यांनी अभिनंदन केले आहे.
सदर खेळाडूंना संचालक शिवाजीराव पाटील तसेच ज्येष्ठ संचालक परशुराम अण्णा गुरव,शाळेचे मुख्याध्यापक राहूल. एन .जाधव . या सर्वांचे प्रोत्साहन मिळत आहे शिवाय क्रीडा शिक्षिका श्रीमती अश्विनी पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
खेळाडूंचे खानापूर तालुक्यातुनअभिनंदन होत आहे.
