संदीप क्रांती न्यूज
खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्यातील देगावचे युवा नेते आनंद बुद्धाप्पा गावडे यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.
यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1978 साली झाला.
तालुक्याच्या अतिदुर्गम जंगल भागात शिक्षणाची सोय नसल्याने केवळ इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण घेता आले. शिक्षणाची इच्छा असून शिक्षण घेता आले नाही. पुढील शिक्षणावर पाणी सोडून त्यांना बालवयतच गोव्याला कामाच्या शोधात जावे लागले.
परंतु देगाव गावची आठवण त्याना कासी शांत बसू देत नव्हती. काही वर्षांनंतर पुन्हा ते देगावला येऊन देवाच्या समाजकार्यात सहभागी झाले देवाच्या समाजकार्याबरोबर गेली 20ते 22 वर्षे भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आज तगायत देगाव परिसरात कार्यरत आहेत.खानापूर तालुक्याच्या दुर्गम अशा जंगल व मागासलेल्या देगाव सारख्या खेड्यात परिसरात समाजसेवेसाठी वाहून घेतले. देगाव परीसरात कोणते संकट येऊ दे. कोणतेही कार्य असुदे ते जातीने पुढे जाऊन ते काम यशस्वी पार पडण्यास नेहमी अग्रेसर असतात.
देगाव गावच्या शैक्षणिक समस्या तसेच गावच्या विकासाबद्दलच्या समस्या यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील कुठेही क्रिकेट स्पर्धा असो. ते जातीने उपस्थित असतात. कुणाचेही हॉस्पिटलचे काम असो मग रात्र असो दिवस असो त्यांचे हाकेला धावून जाणारे असे हे नेते आहेत.
केवळ कर्नाटक राज्यात भाजपमध्ये राहून कार्य करणारे एकनिष्ठ भाजप नेते नव्हे . तर गोव्यामध्ये सुद्धा स्वर्गवासी मंत्री मनोहर परिकर साहेबांच्या सोबत भाजपमध्ये कार्यरत होते.आणि आज सुद्धा भाजपचे नेते म्हणून गोव्यात कार्यरत आहेत.
भाजप नेते आनंद गावडे हे भावी तालुका पंचायत उमेदवार म्हणून गावच्या नागरिकांतून चर्चिले जाते. देगाव गावचा काहीतरी विकास करावे. तसेच दुर्गम भागातील भीमगड अभयारण्य कुठल्याही समस्या ते सोडवतील यासाठी त्यांना तालुका पंचायत उमेदवार करणे गावचे कर्तव्य आहे. अशी गावकऱ्यांची समज आहे.
अशा निष्ठावंत भाजपचे युवा नेते आनंद गावडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,!