“शिरोलीवाड्यानंतर संगरगाळीतही हत्तींचे थैमान”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शिरोली वाड्यानंतर संगरगाळी (ता. खानापूर) येथील अँड महादेव पाटील यांच्या शिवारातील भात वाळ्याचे पाच हत्तीनी प्रचंड नुकसान केले.
त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना शेतीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी रात्री संगरगाळी गावच्या मेलकी शिवारातील अँड महादेव पाटील यांच्या भाताच्या वळ्याना हत्तींनी विस्कटून टाकल्याने भाताचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नुकताच भात कापणी करून शिवारात भाताच्या वळ्या रचल्या होत्या. रविवारी रात्रीच्या वेळी हत्तीच्या कळपाने शंभरहुन अधिक पोती भात होणार्या पिकाचे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर शंकर मन्नोळकर यांच्याशिवारातील उद्या भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे.
हत्तीकडुन नुकसान होताच या भागातील वन खात्याचे अधिकारी राजू पवार आपल्या सहकार्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
या भागात हत्ती कडून वारंवार भात पिकाचे तसेच उसाचे नुकसान होत आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी तसेच वन खात्याने या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.
