#तालुका आरोग्यधिकारी डॉ. महेश किवडसनावर यांचे आव्हान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा आरोग्य खाते व खानापूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत खानापूर तालुक्यात क्रिया कुष्ठरोग रूग्न शोध आणि जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने दिसून येत आहे. आरोग्य विभागाने विविध सरकारी विभागाशी समन्वय साधून कुष्ठरोग्याच्या प्रसाराला आळा आणण्यासाठी त्याचप्रमाणे बाधितांचे ओळख पटवून तातडीन उपचार करण्यासाठी शाळा कॉलेजेस संघसंस्था आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय आरोग्य विभागाचे कर्मचारी अशा कार्यकर्त्यां आणि स्वयंसेवक प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. कुष्ठरोग तपासणी व औषधोपचार मोफत असून नागरिकांनी सहकार्य करावे. असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश किवडसनावर यांनी केले आहे.
