संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरुवार दिनांक 20 रोजी सायंकाळी गंगा पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी अर्बन बँकेचे निवृत्त मॅनेजर आर पी जोशी यांच्या हस्ते गंगा पूजन व मूर्ती पूजन करण्यात आले. यावेळी मलप्रभा नदीचे महिलांनी आरती ओवाळून पूजन करण्यात आले.
यावेळी पुरोहित म्हणून दीपक चिटणीस यांनी विधिवत पूजा करून घेतली. यावेळी आरती गाऊन गंगापूजन करण्यात आले.
यावेळी गंगापूजन कार्यक्रमाला अर्बन बँकेचे निवृत्त मॅनेजर आर पी जोशी भाजपनेते राजेंद्र रायका, श्रीकांत नाटेकर, नगरसेवक नारायण ओगले, श्री जवळी, विठ्ठल हळदनकर, भाऊ चौगुले, वासुदेव साखळकर ,मनोज रेव्हणकर मान्यवर उपस्थित होते
यावेळी गंगापूजन कार्यक्रमाला शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
