संदेश क्रांती न्यूज:

खानापूर प्रतिनिधी
कणकुंबी वन विभागाचे वन अधिकारी देवेंद्र माने हे नुकताच नव्याने रुजू झाले आहेत. कणकुंबी भागातील चिगुळे (ता.खानापूर ) गावच्या ग्रामस्थांनी भेट देऊन कणकुंबी वन विभागाचे नवीन वनाधिकारी देवेंद्र माने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
चिगुळे गावचे ग्रामस्थ व माजी सैनिक गणपत गावडे यांनी चिगुळ परिसरातील समस्या मांडल्या. व त्या समस्या पूर्ण करा अशी मागणी केली.
यावेळी वन अधिकारी देवेंद्र माने यांनी चिगुळे परिसरातील समस्या जाणून घेऊन त्या समस्या त्वरित सोडण्याचे आश्वासन दिले.
चिगुळे गावाच्या अनेक समस्यांचा नागरिकांना भेडसावत आहेत, त्यावर पर्यायी मार्ग काढा अशी मागणी केली.
यावेळी चिगोळे गावचे ग्रामस्थ माजी सैनिक गणपत गावडे, भीवा चोर्लेकर . कृष्णा गावडे. लक्ष्मण चौगुले. संतोष चौगुले. प्रकाश चौगुले. प्रकाश नाईक आदी उपस्थित होते.
