संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगाव ( तालुका खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना लोककल्प फाउंडेशनच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप बुधवार दिनांक 19 रोजी शाळेच्या सभागृहात पार पडले.
यावेळी कार्यक्रमाला गावचे नागरिक व शिक्षण प्रेमी महादेव दळवी तसेच शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष विष्णू चोपडे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी लोककल्प फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करून मोठे सहकार्य केल्याबद्दल शाळेचे कमिटी पालक व विद्यार्थी यांनी मनःपूर्वक आभार मानले.
