#14 वर्षाखालील व 17 वर्षे खालील नेटबॉल संघाची राज्यस्तरीय निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील नेटबॉल संघाची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड होऊन ऐतिहासिक झेप घेतली.
समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी नुकताच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत नेटबॉल स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.
या जिल्हास्तरीय झालेल्या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने नेटबॉल स्पर्धेत खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच 17 वर्षा खालील मुलांच्या संघाने नेटबॉल स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला. यामध्ये पाच खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तर एकूण 22 खेळाडूंची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत निवड झाली आहे.
खानापूर तालुक्यात प्रथमच नेटबॉल स्पर्धेत बावीस खेळाडूंची निवड झालेली पहिली शाळा ती म्हणजे समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर होय.
समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक बाळकृष्ण हलगेकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळत आहे. तर शाळेच्या एडमिन सौ दिव्या नाडगौडा व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.
त्यांच्या यशाबद्दल खेळाडूंचे तसेच क्रीडा शिक्षक बाळकृष्ण हलगेकर यांचे स्कूलचे सचिव डॉक्टर डी.ई.नाडगौडा यांनी अभिनंदन केले आहे.
समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या 22 खेळाडूंची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत निवड झाल्याबद्दल खानापूर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
