संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शैक्षणिक संस्थेच्या गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल, इदलहोंड येथे रविवार दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी 1991-92 च्या बॅचचा भव्य स्नेह मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबरराव यशवंतराव पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने रेखा ब. पाटील व रूपा कदम यांनी केली
प्रास्ताविक मोहन निलजकर (आर्मी) यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बबन डेळेकर, प्रल्हाद पाटील, मोहन निलजकर, परशराम मन्नोळकर, रूपा कदम, रेखा पाटील, परशुराम चोपडे भुजंग नार्वेकर हनमंत जाधव हनमंत पाटील आणि कृष्णा अनगोळकर यांचा मोलाचा वाटा राहिला.
कार्यक्रमात 1991-92 च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जुन्या आठवणींना उजाळा देत, सर्वजण पुन्हा एकत्र आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. हास्य-विनोद, सांस्कृतिक कार्यक्रम, अनुभवकथन आणि शिक्षकांचा सन्मान अशा विविध उपक्रमांनी स्नेहसंमेलन रंगतदार झाले.
शाळेचे आदरणीय शिक्षक — डी. पी. जाधव मुख्याध्यापक , एस. के. पाटील इतिहास शिक्षक , एम. डी. पाटील विज्ञान शिक्षक, पी. ओ. पाटील गणित शिक्षक, एन. एन. दळवाई कन्नड शिक्षक, व्ही. एल. निडगलकर शारीरिक शिक्षक, एस. एच. पाटील चित्रकला शिक्षक आणि सध्याचे मुख्याध्यापक एम. डी. जाधव सर हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनप्रवासाबद्दल समाधान व्यक्त केले आणि शाळेच्या गौरवात भर टाकणारा हा उपक्रम असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन श परशुराम तुकाराम चोपडे (शारीरिक शिक्षक) यांनी केले.
आभार प्रदर्शन माया मोरे (शिक्षिका) यांनी केले.
