#खानापूर मराठा मंडळ पदवी कॉलेज ते करंबळ फाटा पर्यंतच्या रस्त्याची होणार पाहणी!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
कारवार मतदार संघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची गुरुवार दिनांक 6 रोजी दुपारी तीन वाजता खानापूर भेटीवर येत आहेत.
भेटी दरम्यान खानापूर मराठा मंडळ पदवी कॉलेज ते करंबळ फाटा पर्यंतच्या रस्त्या साठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने 14 कोटी रुपयांच्या खर्चाने करण्यात येत असलेल्या रस्त्याची पाहणी करून तपासणी करणार आहे. कारण रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल अनेक तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाविषयी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेणार आहेत.
यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी रस्त्याची पाहणी करून खानापुरातील स्टेट बँकेजवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला भेट देणार आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. तसेच खानापूर तालुक्यातील महत्त्वाच्या विकास कामाबाबत तसेच स्थानिक घडामोडी बाबत सविस्तर चर्चा करणार आहे.
तसेच बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात भाजप पदाधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत. तसेच नागरिकांच्या अडचणी विषयी चर्चा करणार आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील भाजपच्या नेत्यांनी , पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याच्या आव्हान भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
