संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
सार्वजनिक शिक्षण खाते व जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर पार पडल्या.
या क्रीडा स्पर्धेत ज्योती अथलेटिक स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत राज्यस्तरीयपातळीसाठी मजल मारली आहे. अनुज श्रीकांत हाणगोजी याने 14 वर्षा
खालील मुलांच्या गटात 200 मिटर, 400 मिटर, 600,मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक घेत तीन सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे त्याला वैयक्तिक विजेतेपद देऊन गौरविण्यात आले. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात जोत्सना हंगिरकर हिने 100,200 मी धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकाविला.
17 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये सर्वेश राजू नाईक याने 1500 मीटर धावणे ,3000 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
करुणा लक्ष्मण हलगेकर हिने 3000 मीटर धावणे प्रथम क्रमांक तर 1500 मीटर धावणे द्वितीय क्रमांक पटकाविला. स्वयंम विनायक पाटील यांनी 200 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक तर ऋतिक राजाराम पाटील याने 3000 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक तर शशिकुमार याने 400 मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. यामधील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या खेळाडूंची हासन येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशामुळे खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व खेळाडूंना ज्योती अथलेटिक स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक एल जी कोलेकर व प्रशिक्षक अनिल गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.तर संबंधित खेळाडूंच्या शाळेचे मुख्याध्यापक व शारीरिक शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
