संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नंदगड माजी जिल्हा पंचायत सदस्या व नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालिका सौ पार्वती विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा त्यांच्या निवासस्थानी पार पडला.
यावेळी भाजपनेते व खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील,माजी तालुका पंचायत उपसभापती व तालुका भाजपा प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारिहाळ, श्री व्हन्नव्वा देवी सोसायटीचे संचालक नागाप्पा भुज गुरव उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या पत्नी सौ. पार्वती पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्या, व नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्या यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पहार, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
,


