#सतीश सावंत यांची राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलच्या खेळाडूंनी नुकताच सौंदत्ती तालुक्यातील पंचाळेश्वर देवस्थान मनवळी येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ व योगा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत संपादन केले आहे.
या स्पर्धेत सतीश सावंत यांनी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांची राज्य स्पर्धेत निवड झाली आहे.
जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेत मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलच्या सहा खेळाडूंनी भाग घेतला होता.
यामध्ये बुद्धिबळ स्पर्धेत सतीश सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला त्याची राज्य स्पर्धेत निवड झाली. तर मंथन लाड, शंकर खेरवाडकर हे अंतिम फेरीतुन बाहेर पडले.
मुलींच्या गटातून सानिका कोवाडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर श्रावणी कदम ही अंतिम फेरीतून बाहेर पडली.
विजय खेळाडूंचे खानापूर तालुक्यातील अभिनंदन होत आहे.
विजय खेळाडूचे संस्थेच्या अध्यक्ष राजश्री नागराजू यांनी अभिनंदन केले. तसेच संचालक शिवाजीराव पाटील परशुराम गुरव यांनी अभिनंदन केले. विजय खेळाडूंना मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी व क्रीडा शिक्षक सी के गोमान्नाचे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तर सहशिक्षकांचे सहकार्य मिळत आहे.

