#रस्त्याच्या पॅच वर्कला सुरुवात!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, शिरोली,हेमाडगा रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरावस्था झाली.या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याची दुरावस्था पाहून खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी
गेल्या दोन महिन्या पासून डागडुजी व पॅचवर्क करावं म्हणून खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते श्री गस्ती यांना वारंवार विनंती केली होती. परंतु ते कामाची दिरंगाई होत होती. गणपती दसरा आणि आता दिपवाळी सणाच्या दरम्यान विद्यार्थी, शेतकरी, कामगार , आदींचे खानापूर ते गोवा येणारा जाणाऱ्या नागरिकांची हाल होत आहेत .अनेक अपघात झाले आहेत.
शेवटी अँड ईश्वर घाडी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते श्री गस्ती यांची भेट घेऊन शिरोली, मंणतुर्गा ते हेम्माडगा पर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क करून देण्याची मागणी केली. यावेळी शेवटचा पर्याय दिला होता आणि त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते श्री गस्ती यांनी लागलीच पॅचवर्कचे काम जेसीपी मार्फत सुरू केले आहे. त्यामुळे समस्या दूर झाली. याचे सर्व श्रेय खानापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांना देण्यात येत आहे. याबद्दल मणतुर्गा, नेरसा हेम्मडगा, शिरोली, आदी भागातील गावातून अभिनंदन होत आहे.
यावेळी स्थानिक नागरिक नारायण काटगाळकर, प्रमोद देसाई ,मंणतुरग्याचे पोवाडे, राजेश पाटील इत्यादींनी प्रयत्न केला
शेवटी मृत्यूच्या सापळ्यातून हा रस्ता मोकळ्या झाल्याचा विश्वास अँड ईश्वर घाडी यांनी व्यक्त केला.तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते श्री गस्ती यांच्या अभिनंदन केले.

