संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहर अंतर्गत येणाऱ्या मराठा मंडळ डिग्री कॉलेज ते करंबळ क्रॉस पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला 14 कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन कामाला प्रारंभ झाला आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता एकाच वेळी उखडून टाकला आहे. त्यामुळे शिवस्मारक ते करंबळ क्रॉस पर्यंतच्या रस्त्यावरुण नागरिकांना वाहनधारकांना येजा करणे कठीण झाले आहे.या भागातील बसेस या मार्गावरून बंद झाले आहेत. तसेच व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी पसरली आहे. तेव्हा या मार्गावरील एका बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करावे व दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत ठेवावी. जेणेकरून सर्वांना सोयीचे होईल. या समस्या दूर करून रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा तसे न झाल्यास रस्त्याचे काम बंद पाडू.असा कडक इशारा . खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी शुक्रवारी दि 17 रोजी खानापूर सार्वजनिक बांधकामांचे अधिकारी श्री गस्ती यांना निवेदन देऊन करण्यात आले.
यावेळी अँड ईश्वर घाडी म्हणाले की, 14 कोटी रुपये निधीचा लाभ खानापूर शहराला प्रथमच होत आहे. तेव्हा या रस्त्याचा योग्य प्रकारे निधी वापरला जावा. रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे. रस्त्यावर काम चालू असलेले बोर्ड लावा.व सर्व सोयी उपलब्ध कराव्या. अन्यथा खानापूर शहरवासीय गप्प बसणार नाहीत. असा इशारा दिला.
यावेळी अँड ईश्वर घाडी,भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचारी माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल, राजेंद्र रायका, समितीचे नेते मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, नारायण कटगाळकर, शामराव पाटील, बी.बी. पाटील, श्री सुळकर आदींनी खानापूर शहराच्या समस्या मांडल्या व शहरांतर्गत होणाऱ्या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे.अशी मागणी केली.
यावेळी खानापूर शहरातील व्यापारी, फिश मार्केट दुकानदार, नागरिक, शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते श्री गस्ती यांनी निवेदनाचा स्वीकार करून व लोकांच्या समस्या ऐकून घेऊन रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करू असे आश्वासन दिले.
