#लाखोचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कोडचवाड (ता.खानापूर) परिसरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. इतका जोरदार पाऊस झाला की पावसाचे पाणी सर्वत्र पसरले. रस्त्यावरचे सांड पाणी संतोष सद्यापा गडाद यांच्या जनावराच्या गोठ्यात घुसल्याने दोन जनावरे दगावली. यात त्यांचे लाखोचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून माहिती अशी की बुधवार सायंकाळी सात वाजता अवकाळी पावसाने सुरुवात केली .
कोडचवाड परिसरात बुधवारी सायंकाळी तब्बल तासभर अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे गावात पाणीच पाणी झाले . कोडचवाड ग्रामपंचायतच्या मुख्यरस्त्यावरील सांडपाण्याचा लोंढा संतोष गडाद यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसल्याने काही वेळातच चार ते पाच फूट पाणी गोठ्यात शिरल्याने गोट्यातील चार ते पाच जनावरे होती. जनावरांना वाचवण्यासाठीनागरिकांनी मोठ्या कष्टाने गोठ्यातील जनावरे सुरक्षित बाहेर काढली. मात्र दोन म्हशी गुदमरून गोठ्यातच मरण पावल्या.
या घटनेमुळे संतोष गडाद यांना लाखोचा आर्थिक फटका बसला.
लागलीच तहसीलदार व पशु खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन पंचनामा केला. व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
कोडचवाडात पुन्हा अशा घटना होऊ नये.
यासाठी ग्रामपंचायत ने पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.
