संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मुक्तीमठ कसबा नंदगड ( ता खानापूर) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही 48 व्या दिवसांच्या गणेश पूजनाचा कार्यक्रम रविवार दिनांक 11 रोजी पार पडला.
रविवारी सकाळी बेळगाव मुक्ती मठाचे श्री श्री श्री श्रीतपो रत्न शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित पूजेला प्रारंभ झाला.
यावेळी मुक्ती मठ कसबा नंदगड मठाचे धनंजय महाराज उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला तोपिनकट्टी जंगली महाराज मठाचे रामदास महाराज,भाजप नेते राजेंद्र रायका, बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर तालुका भाजप माजी अध्यक्ष संजय कुबल, मारुती महाराज , राजू पेडणेकर,मारुती बिलावर, कसबा नंदगड ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय पाटील, नंदगड ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, जोसीराव पाटील , निलेश सोनोळी व इतर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी आशीर्वाचन झाल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कुपटगिरी भजनी मंडळ चा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री धनंजय महाराज मुक्ती मठ तसेच उत्सव कमिटी व वारकरी मंडळी, आंबेडकर मंडळ सम्राट युवक मंडळ आदींनी परिश्रम घेतले
