खानापूर प्रतिनिधी
नंदगड तालुका खानापूर येथील नंदगड मार्केटिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सोमवार तारीख सहा ऑक्टोबर रोजी तेरा जागा पैकी दहा जागा बिनविरोधात पार पडल्या. या दहा जागा माजी आमदार डीसीसी बँकेचे संचालक, नंदगड मार्केटिंग सोसायटीचे विद्यमान चेअरमन अरविंद पाटील यांच्या पॅनल मधून बिन विरोध निवडून आल्या. उर्वरित तीन जागांसाठी पी एल डी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील व इतर नेते मंडळी बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. यासाठी रविवार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.
सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक बिनविरोधात पार पडली .
विजयी उमेदवार व वर्ग माजी आमदार अरविंद पाटील. नंदगड , श्रीशैल पाटील लिंगन मठ, उदय पाटील चापगाव, चांगाप्पा बाचोळकर इदलहोंड, ज्योतिबा भरमपनावर आवरोळी, दामोदर नाकाडी बैलूर, प्रकाश गावडे गुंजी, आदींचा समावेश आहे.
ब गटातील अनुसूचित जाती मधून अ वर्गासाठी डॉ. रफिक हलशिकर जांबेगाळी, यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर महिला ब गटातून पार्वती विठ्ठल पाटील कसबा नंदगड व तेजस्विनी होसमणी खानापूर यांची निवड झाली आहे.
उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे.
माजी आमदार अरविंद पाटील यांच्या पॅनल मधून ब मागासवर्गीय गटातून महारुद्रय्या हिरेमठ इटगी, ब अनुसूचित जाती गटातून जितेंद्र मादार नंदगड, बअनुसूचित जमाती
गटातून निंगाप्पा तलवार हंदूर हे निवडणूक लढवणार आहेत.
तर विरोधी पॅनल मधून ब मागासवर्गीय गटातून रुक्माणा झुंजवाडकर खैरवाड, अनुसूचित जाती गटातून देवाप्पा मादार हलशी, ब एसटी गटातून निंगाप्पा नाईक खानापूर हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.



