संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापासून नवरात्रोत्सव निमित्त खानापूर शहरासह उपनगरात दुर्गामाता दौडीला उत्साहात स्वागत होत आहे.
खानापूर येथील शिवाजी नगरातील दुसऱ्या गल्लीत मंगळवार दिनांक 30 रोजी पहाटे दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवाजी नगरातील दुसऱ्या गल्लीतील नागरिकांनी गल्लीत भगव्या पताका तसेच घरासमोर रंगीत रांगोळ्या घालून दौंडची आयोजन केले होते.
दुर्गा मातेची दौड येताच सुहासिनीने आरती ओवाळून स्वागत केले. दुर्गामाता दौड मध्ये मावळ्याने भगवा फेटा आणि पांढरा पोशाख परिधान केला होता.
पहाटे साडेपाच वाजता खानापूर शिवस्मारकातून दौर्डीला प्रारंभ झाला होता. शिवाजी नगर मधील दुसऱ्या गल्लीत दौडीचे स्वागत करण्यात आले.
दवडीच्या मार्गावरून प्रेरणा मंत्र दुर्गामातेचे नामस्मरण कीर्तन अभंग सादर करण्यास विविधतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या स्वागत करून प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. यावेळी शिवाजीनगर दुसऱ्या गल्लीतील नागरिक हरीष रायका, आर के पाटील, आनंद पाटील,मारुती अळवणी, मारुती पाटील, मंजू मुतनाळ, पुंडलिक हेंबाळकर, प्रकाश निलंगी, मोहन पुरी, ज्योतिबा मासेकर, जगदीश झळके, फोटोग्राफर दत्ता गावडे, मंगेश गावडे, राजू शिंदे, विनायक शिंदे ,शंकर गावडे, विनायक पुरी, रोहित पाटील, राहुल पाटील तसेच इतर नागरिक महिला वर्ग,बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.