संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक सर्वेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी आणि मातृभाषा मराठी असेच नमूद करण्याचे आव्हान खानापूर तालुका महाराष्ट्र येथील समितीच्या बैठकीत माजी आमदार पाटील यांनी केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचे विविध पोट जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजा मध्ये एकसंघ तेचा अभाव आहे. मात्र सरकारच्या या सर्वेक्षणातून समाजाला एकत्र येण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्यामुळे शासकीय विहित सर्वेक्षण अर्जावरील माहिती योग्य पद्धतीने करून आपण सांगितलेली माहिती दिल्या पद्धतीने भरलेली आहे की नाही. याची खातरजमा करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.
यावेळी मुरली पाटील , प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, आनंद पाटील, डी.एम. भोसले, पांडुरंग सावंत, रुक्मिना झुंजवाडकर, आदींची भाषणे झाली.
बैठकीला अजित पाटील, राजाराम देसाई, आनंद पाटील ब्रह्मानंद पाटील अप्पाराव मुतगेकर, मारुती परमेकर, जयराम देसाई, रवींद्र शिंदे, कृष्णा मनोळकर आधी शेकडो समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
