संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता . खानापूर) गावच्या ग्रामदेवता श्री माऊली मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्त गुरुवारी दि. 25 रोजी सकाळी चौथ्या माळेचे पूजन सौ. व श्री. महेश विठ्ठल कुंभार (मुख्याध्यापक) यांच्या शुभहस्ते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी गर्लगुंजी गावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या शुक्रवारी दिनांक 26 रोजी सकाळी साडेसहा वाजता देवीच्या पाचव्या माळेचे पूजन सौ व श्री राजू सिद्धांनी यांच्या उपस्थित होणार आहे तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे. असे आव्हान करण्यात आले आहे.
