#खानापूर को.आप. बँकेचे१०३वी वार्षिक सभा संपन्न!
संदेश क्रांती न्यूज,:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर को. आप. बँकेची १०३ वी वार्षिक सभा संपन्न झाली. या बँकेने एक वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या वर्षभरात बँकेच्या ठेवीमध्ये सात कोटी तेरा लाखाची वाढ झाली असून आर्थिक स्थिती मजबूत असल्याची माहिती बँकेच्या चेअरमन अमृत शेलार यांनी वार्षिक सभेच्या
अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले.
प्रारंभी मुख्य व्यवस्थापक विजय साळुंखे स्वागत केले. तर धनगर शाखेचे व्यवस्थापक विश्वास देसाई यांनी ताळेबंदी पत्र वाचन केले. मुख्य शाखेचे व्यवस्थापक रामकृष्ण देसाई यांनी अंदाजपत्रक वाचून दाखवले. कृष्णा गुरव यांनी नफा तोटा पत्रक सादर केले.
खानापूर बँकेत 85 कोटीच्या रुपये ठेवी आहेत. त्यापैकी ३६ कोटी विविध बँक व सहकारी बँकेत सुरक्षित आहेत. तर बँकेने विविध प्रकारची 63 कोटी रुपयाची कर्ज दिली आहेत. अहवाल काळात खेळते भांडवल आठ कोटीने वाढले आहे. ते 107 कोटी ते 88 लाख रुपये झाले आहे. उलाढाल 753 कोटी 96 लाख रुपये इतके असल्याची माहिती चेअरमन अमृत शेलार यांनी सांगितली.
वार्षिक सभेच्या वेळी सभासदांना विविध प्रश्नाचा बडी मार केला. यावेळी चेअरमन अमृतसर यांनी योग्य अशी उत्तरे देऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी सभासदांना खानापूर तालुक्यात सहकार चळवळ रुजविण्यात या बँकेचा सिंहाचा वाटा आहे असे सांगून सभासदांना शांत केले .
