#रेल्वे राज्यमंत्र्याकडे मागणी !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यासह खानापूर तालुक्यात अनेक वारकरी आहेत. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी वास्को ते पंढरपूर अशी रेल्वे सुरू करावी अशी मागणी गर्लगुंजी ज्ञानेश्वर पारायण मंडळाच्या वतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमणा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की बेळगाव जिल्ह्याचा खानापूर तालुक्यात अनेक वारकरी मंडळ आहेत. या वारकरी मंडळींना पंढरपूरला जाण्यासाठी वास्को पंढरपूर ही रेल्वे सोयीचे होणार आहे. तेव्हा वास्को पंढरपूर रेल्वे सुरू करावी. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, आमदार विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी पारायण मंडळाचे पदाधिकारी ह भ प सातेरी चौगुले, श्रीरंग पाटील व भरत गोरे तसेच गावातील वारकरी मंडळी उपस्थित होती.
