“दीड लाखाची नुकसान”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हऺदुर. ( ता. खानापूर) गावात मंगळवारी दि. १६ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर लावलेल्या एक होंडा व दुसरी सुझुकी अशी दोन दुचाकीना अज्ञातानी आग लावल्याने दुचकी जळून खाक झाल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तींनी हे दुष्कृत्य केले आहे . असा अंदाज व्यक्त होत आहे.
याबाबतची माहिती अशी की ,सद्दाम अस्लम सय्यद यांच्या या दोन दुचाकी होत्या. मंगळवारी रात्री सदर दोन्ही दुचाकीना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने जळून खाक झाले आहेत. जर घराने पेट घेतला असता तर मात्र अजून जास्त अनर्थ घडला असता. परंतु नशीब बलवत्तर म्हणून घरांस आग लागली नाही आणि पुढचा अनर्थ टळला. त्यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती समजताच पोलिसांनी बुधवार दि. १७ रोजी हंदूर येथे जाऊन जळालेल्या दुचाकी व घराचा पुढचा भाग थोडा जळालेला आहे त्याची पहाणी केली. व लगेच नंदगड सीपीआय यांना सदर घटनेची माहीती सुरेश जाधव यांनी फोनवर कळविली. व ताबडतोब तपास करून असे दुष्कृत्य करणारावर ताबडतोब कारवाई करावी . अशी मागणी होत आहे.
तसेच नंदगड पोलिसांनी ताबडतोब तपास करून गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस ने नंदगड पोलींसाकडे केली आहे.
यावेळी बसेट्टी सावकार, सुरेश जाधव, देमान्ना बसरीकट्टी, दिपक कवठनकर तसेच हंदूर येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
