संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तो पिन कट्टी (ता. खानापूर) येथील शाळा सुधारणा कमिटी व व्यवस्थापन समिती यांच्या वतीने खास दसऱ्याच्या सणानिमित्त रविवार दि. 21 रोजी सकाळ अकरा वाजता मराठी शाळेच्या पटांगणावर भव्य खो-खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन गावचे सुपुत्र व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव सोमाना हलगेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
ही खोखो स्पर्धा खानापूर तालुका मर्यादित असून, केवळ इयत्ता सातवी पर्यंत शिकत असलेल्या मुलांच्या करिता ठेवण्यात आली असून खेळांडू एका शाळेतील असावेत. प्रत्येक खेळाडू कडून मूळ आधार कार्ड व एस ए टी एस नंबर असणे बंधनकारक आहे. नोंदणी झाल्यानंतर प्रवेश फी परत मिळणार नाही.
खो खो स्पर्धेसाठी प्रवेश फी चारशे एक रुपये (४०१.रु.) असून पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. स्पर्धेच्या वेळी वादविवाद, गैरशिस्त अथवा गैर व्यवहार आदिना वाव दिला जाणार नाही. असे आयोजकांनी आव्हान केले आहे.
