#वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या कडुन शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर वकिल संघटनेच्या वतीने अँड.सुरेश लोटुकर यांचा सोमवारी दि.१ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी होते.
प्रारंभी जेष्ठ वकिल अँड जी एम देसाई यानी प्रास्ताविक केले.
त्यानंतर अँड सुरेश लोटूकर यानी केक कापून वाढदिवस साजरा केला.तर वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार मुर्ती अँड सुरेश लोटूकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला.
यावेळी बोलताना वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी बोलताना म्हणाले की जटगे (ता.खानापूर) सारख्या दुर्गम भागातुन शिकुन वकिल पदवी मिळविली.त्यानंतर खानापूर येथे वकिल व्यवसायात वेगळा ठसा उमठविला.एक निष्कंलक वकिल म्हणून त्यांची ख्याती आहे.एक अभ्यासू व विश्वासू वकिल म्हणून अँड.सुरेश लोटूकर यांचा आदर्श इतरानी घ्यावा. असे विचार व्यक्त केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कार मुर्ती अँड.सुरेश लोटूकर म्हणाले की, माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल मी भारावुन गेलो.गेली अनेक वर्षे वकिली सेवा करण्यासाठी सहकार्य केले. व मार्गदर्शन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. व सर्वाचे आभार मानले.
यावेळी खानापूर वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी.अँड.एम.वाय.कदम,अँड.जी.जी.पाटील,अँड.एन वाय मादार, अँड.एस आय पाटील,अँड.पी वाय पडी पाटील,अँड.नविन सुनगार,अँड.आय.बी.लंगोटी,अँड. पी.एस गद्देकेरी,अँड.व्ही.एस हिरेमठ, संदिप शेमले, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड.जी.जी.पाटील यांनी केले. तर आभार जेष्ठ वकिल अँड.
एम.वाय.कदम यानी मानले.