संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील लायन्स क्लबच्या वतीने खानापूर शहरातील कडोलकर गल्लीतील श्री बसवेश्वर मंदिरासाठी २० प्लॅस्टीक खुर्च्या भेटी दाखल देण्यात आल्या.
येथील श्री बसवेश्वर मंदिरात बुधवारी दि. २० रोजी आयोजित कार्यक्रमात खुच्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बसवेश्वर मंदिराचे चेअरमन चंद्रकांत कोडोळी होते.व्यासपीठावर लायन्स क्लबचे सदस्य अजित पाटील ,भाऊराव चव्हाण,राजू तोपिनकट्टी,रविसागर उप्पिन तसेच मंदिरचे वीरभद्र जवळी,महातेश कोडोळी,शशिधर हिरेमठ,शेखर उप्पीन , विनोद देसाई, सिदिलींग हिरेमठ, सुभाष हंप्पणावर आदी उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लबकडुन श्री बसवेश्वर मंदिरासाठी २० प्लॅस्टिक खुर्ची देणगी दाखल करण्यात आल्या. मंदिरच्या कमिटीने खुर्च्याचा स्विकार केला.