संदेश क्रांती न्यूूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील हेस्काॅम खात्याच्या कार्यालयात प्रत्येक महिण्याच्या तिसर्या शनिवारी ग्राहक मेळावा घेतला जातो. शनिवारी दि .१६ रोजी ग्राहक मेळावा पार पडला. यावेळी सात ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या.
ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंते जगदिश मोहिते होते.
यावेळी बिजगर्णीचे नागाप्पा नारायण पाटील यांनी हलशी येथील ३३ के .व्ही . विधुत पुरवठा सुरळीत करा.तर कसबा नंदगडचे ईर्शाद तहसीलदार यानी मिटर बंद राहुन ही मिटर बील ५००० रूपये आल्याची तक्रार केली.खानापूरचे प्रफूल देशपांड यानी सिंगल फेस वीज पुरवठ्याने वारवार बिघाड होेत आहे.वीज पुरवठा सुरळीत करा.
रामगुरवाडीचे मनोहर मेेलगे यानी मीटर बील बाबत तक्रार केली.याजबरोबर बरगांवचे तुकाराम पाटील यानी आपली तक्रार मांडली.तसेच संदिप पारिश्वाड यानी टी.सी बद्दल तक्रार मांडली. आदीनी ग्राहक मेळाव्यात तक्रार मांडल्या. यावेळी कार्यकारी अभियंते जगदिश मोहित यानी समस्याबाबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
ग्राहक मेळाव्याला राजू पारेकर, अभियंते भरतेश नागनुर (ए.ई.), अभियंते बी.ए. धर्मदास, लक्ष्मी रंगनाथ,जे.बी.नाईकवाडी, आदी कर्मचारी उपस्थित होते.
आभार जावीर नाईकवाडी यानी मांडले.