संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर) येथील जे पी व्ही हायस्कूलच्या खेळांडुनी बरगाव क्लस्टर लेवल कुप्पटगीरी हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील खेळाडून पुढील प्रमाणे यश मिळविले
२००मीटर धावणे ओमकार प्रदीप पाटील द्वितीय क्रमांक,४०० मीटर धावणे,८० मीटर हर्डल्स समर्थ विनोद कदम प्रथम क्रमांक. ६०० मीटर धावणे ओम नारायण पाटील प्रथम क्रमांक, रिले प्रथम क्रमांक.
सांघिक स्पर्धेमध्ये .
मुलांचा व्हाॅलीबाॅल प्रथम क्रमांक.
१७ वर्षाखालील मुलामुलीनी सुद्धा घवघवीत यश संपादन केले आहे. १५०० मीटर धावणे,३००० मीटर धावणे
मोहित रघुनाथ पाटील प्रथम क्रमांक,,हर्डल्स ,१०० मीटर धावणे मारुती अजित पाटील प्रथम क्रमांक,यश मर्यापा धामणेकर ५ कि.मीटर वाॅकिंग प्रथम क्रमांक दत्तात्रय कृष्णा पाखरे उंच उडी प्रथम क्रमांक.विघ्नेश श्रीकांत कदम लांब उडी प्रथम क्रमांक,आप्पा मारुती सुतार,सोहम शंकर पाटील द्वितीय क्रमांक
गोळा फेक, थाळी फेक, हॅमर फेक. मारुती फोंडू सुतार प्रथम क्रमांक तर साहिल पुंडलिक मेलगे भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक. सुरज संजय खटोरे
हॅमर थ्रो मध्ये द्वितीय क्रमांक.ट्रिपलजम मध्ये भीमराव महादेव कदम प्रथम क्रमांक
सोहम शंकर पाटील द्वितीय क्रमांक.
#सांघिक स्पर्धेमध्ये!
रिले प्रथम क्रमांक, कबड्डी प्रथम क्रमांक, व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक, थ्रो बॉल प्रथम क्रमांक, खो खो खेळामध्ये द्वितीय क्रमांक.
तसेच मुलींमध्ये १०० मीटर धावणे, १०० मीटर हर्डल्स कु.प्रतिज्ञा ज्योतिबा भतवाडकर प्रथम क्रमांक. सांघिक खेळामध्ये मुलींनी थ्रोबॉल या खेळांमध्ये प्रथम क्रमांक असे घवघवीत यश संपादन केलेले आहे.
या खेळाडूंना विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव परशुराम नंदीहळ्ळी यांचे मार्गदर्शन तसेच ज्योतिराव फुले विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच क्रीडा शिक्षक संतोष पांडुरंग मेलगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या विजयी खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धे साठी निवड झालेली आहे .याबद्दल खानापूर तालुक्यात खेळांडुचे अभिनंदन होत आहे.