संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सतत गेल्या आठ दिवसापासपन पावसाचा जोर वाढला असुन येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे आज सोमवारी दि.१८ रोजी बेळगावसह खानापूर तालुक्यात अतिवृष्टीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने असुन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यानी दिलेल्या माहिती नुसार आज बेळगाव ,खानापूर ,कित्तूर ,बैलहोंगल,
सौंदत्ती तालुक्यातील अंगणवाडी,प्राथमिक,हायस्कूल व पदवीपूर्व काॅलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.