#पदयात्रेत खानापूर नंदगड रस्त्यातील खड्ड्यांचा निषेद!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
संविधानाने ” एक व्यक्ती एक वोट” हा अधिकार दिलेला असताना निवडणूक आयोगाने वोटर लिस्ट मध्ये घोळ घालत असुन हा सरळ सरळ संविधानावर आघात असुन निवडणुक आयोग वोट चोरीत करत असल्याचे आरोप विरोध पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुरव्यानिशी सिध्द केले आहे.
यासाठी भारतीय काॅग्रेसने देशभर वोटर अधिकार पदयात्रा काढण्यात येत असुन याचाच एक भाग म्हणून माजी आमदार ,एआयसीसी सचिव डाॅ अंजली निंबाळकर याच्या मार्गदर्शनाखाली खानापूर नंदगड वोटर अधिकार पदयात्रेचा शुभांरभ खानापूर शिवस्मारकातुन केल्याचे खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी बोलताना व्यक्त केले.
यावेळी खानापूर नंदगड रस्त्यावरील खड्डयात रोप लावून निषेद केला.त्यानंतर नंदगड येथील संगोळी रायाण्णा समाधीचे दर्शन घेऊन पदयात्रे निमित्त नंदगड येथील मार्केटींग सोसायटीच्या कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नेते मल्लीकार्जून वाली होते. व्यासपिठावर माजी आमदार ,एआयसीसी सचिव डाॅ अंजली निंबाळकर, खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी,शहर अध्यक्ष महांतेश राऊत,महिला नेत्या सावित्रि मादार, सुर्यकांत कुलकर्णी व इतर तालुका काॅग्रेस नेेते उपस्थित होते
यावेळी बोलताना माजी आमदार ,एआयसीसी सचिव डाॅ अंजली निंबाळकर, म्हणाल्या की,
राहुल गांधी यांनी बिहार मधून वोटर अधिकार यात्रेची सुरूवात केली. हाच धागा पकडून देशभरात बिहार नंतर फक्त खानापूर कॉंग्रेस ने “वोट अधिकार पदयात्रा”काढली. राहुल गांधीच्या पाऊलावर पाऊल ठेवत किंवा आपले नेते राहुल जी यांना पाठींबा म्हणून आपल्या मतदारसंघात आज खानापूर ते नंदगड अशी १२ किमी ची पदयात्रा काढली.
त्या पुढे म्हणाल्या की निवडणूक आयोग विकला गेला आहे की काय ? अशा पद्धतीने निवडणुक आयोगाचे काम भाजपा च्या सल्ल्याने चालले असल्याची शंका देशभरातील विरोधी पक्षांनी व्यक्त केली असून निवडणूक आयोग संविधानाप्रमाणे काम करत नसून भाजपाचा बटीक असल्यासारखे वागत असल्यामुळेच वोट चोरी सारखे गंभीर देशद्रोही कार्य त्यांच्या हातून होताना दिसत आहे.
राहुल गांधी यांनी वोट चोरी पुराव्यानिशी उघडी पाडली असून नुकताच देशभरातील ३०० खासदार निवडणूक आयोगाच्या दफ्तरावर मोर्चा घेऊन गेले असता मोदी सरकारने ३०० खासदारांची धरपकड केली असल्याचे टीव्हीवर ,सोशल मिडीया दिसुन आले.निवडणूक आयोगास प्रश्न विचारले तर भाजपा वाले उत्तर का देत आहेत ? याचाच अर्थ निवडणूक आयोग व भाजपाची अभद्र युती आहे का ? अशी रास्त शंका देशवासियांना येत आहे.असे मत प्रगट केले.
यावेळी महांतेश राऊत, सावित्री मादार, , यांना विचार मांडले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन वाली यांचे अध्यक्षीय भाषण झाले .
यावेळी खानापूर तालुक्यातील हजारो काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.