संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गे ( ता.खानापूर) येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब समारंभ शुक्रवार दि.१५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावचे वतनदार बाबुराव गणपतराव पाटील- माजी अध्यक्ष के.एम. एफ. हे होते. प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे स्लॅब अमृत महादेवराव शेलार-चेअरमन दी खानापूर तालुका को-ऑप बँक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश फोटो पूजन जयसिंग आण्णाप्पा देसाई, रवळनाथ देव पूजन नूतन देवाप्पा गुरव,, विठ्ठल रुक्मिणी पूजन महेश गणपती पाटील, श्री कृष्ण पूजन संतोष सदाशिव दळवी, कासव पूजन प्रभाकर बोबाटे, कलावती पूजन कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून खालील देणगीदार उपस्थित होते
. अमृत महादेव शेलार -५१०००,राहुल अशोकराव पाटील -१११११, रमेश लोहार -५५५१, जयसिंह देसाई – ५०२१,संतोष दळवी -५०००,ईश्वर बोबाटे-११०१,. प्रल्हाद गुंडपीकर १०००,. यशवंत देसाई १००० रिचर्ड अल्मेडा १०००, प्रल्हाद मादार १०००
आदीनी बहुमोल देणगी प्रदान केली. यावेळी एसडीएमसी कमिटी मणतुर्गे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून श्री रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समिती आणि सुर्योदय ग्रुप मणतुर्गे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब शेलार कार्याध्यक्ष जीर्णोद्धार समिती, प्रकाश पाटील, मलाप्पा देवलतकर, शांताराम पाटील, नामदेव गुरव, मरू देवकरी,श्रीकांत भटवाडकर, वसंत देवलतकर, राजाराम पाटील, कुमारी वैभवी जाधव आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते