#खेळांडुचा सत्कार !
्संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने १५ आँगष्ट ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव मेलगे होते. तर व्यासपिठावर माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव मेलगे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन
विविध खेळांडुचा सत्कार!
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावातील खेळांडु क्रिडाक्षेत्रातील राज्यस्तरीय खो खो खेळात सुवर्ण पदक मिळविलेला वैभव सातेरी गोरे याचा संघटनेच्यावतीने मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेली रोहिणी पाटील हिचा ही मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यातआला. तसेच १२ वीच्या परिक्षेत प्रथम आलेली प्रियांका प्रकाश निट्टूरकर हिचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर १० मध्ये प्रथम आलेली रेणूका हणमंत धामणेकर हिचा ही मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर गर्लगुंजी गावात प्रथम वकील झालेली कन्या सुस्मिता साताप्पा पाटील हिचा ही मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव मेलगे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यानी जिद्दीने प्रामाणिकपणाने अभ्यास व खेळात मेहणत घेतली तर यश नक्की मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या सत्कार मुर्ती होय. आजच्या सत्कार मुर्तीनी जिद्दीने कष्ट घेऊन अभ्यास आणि खेळात यश संपादन केले.आणि गावचे नाव उज्वल केले. अशाच प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केले यशस्वी व्हाल. असे मत व्यक्त केले.
यावेळी स्वातंत्र्यदिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी सैनिक विद्यार्थी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.