#न्यायमुर्ती नागमोहन दास अहवालानुसार चलवादी समाजाचे पाच भागात विभाजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अंतर्गत आरक्षणाच्या नावाखाली नागमोहन दास अहवाला नुसार चलवादी समाजाचे पाच भागात विभागात विभाजन केल्या संदर्भात खानापूर तालुक्यातील चलवादी समाजाच्या वतीने महासभेचा निषेध आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील विविध दलित संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदाराना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे.की,न्यायमुर्ती नागमोहनदास यांच्या एकल चौकशी आयोगाने जाती कुटूंबाचे संर्वेक्षण केले.आणि अहवाल सादर केला.या सर्वेक्षण मध्ये अहवाल सादर करून लाखो कुटूबांतील कोट्यावधी लोकाचे सर्वेक्षणात पाच विभात विभागले आहे.
हा चलवादी समाज्यावर अन्याय झाला असुन न्यायमुर्ती नागमोहनदास यानी एका समाजाला खूष करण्यासाठी तर दुसर्या समाजावर अन्याय केला आहे.
हा अन्याय दुर करावा.असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाचा स्विकार तहसीलदार दुडाप्पा कोमार यानी करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना कर्नाटक राज्य चलवादी महासंघ खानापूर तालुका अध्यक्ष इरापा मादार,जिल्हा अध्यक्ष मल्लिकार्जून राशिंगे,जिल्हा सरचिटणीस प्रकाश मादार,महांतेश प्रातदार,राजशेखर हिडलगी,राघवेंद्र चलवादी,प्राणेश तलवार,मनोहर मादार,रामंचंद्र मादार, राजू खातेदार,शिवाजी मादार,संजय मादार,कलमेश्वर मादार, भरमाणी कोलकार,लक्ष्मण कांबळे. सुरेश शिंगे,गोपाळ मादार,किरण मादार,किरय्याप्पा मादार,बसवंत मादार,ए.एल.कोलकार व शेकडो विविध दलित समाजाचे नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.