संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी बेंगलुरू येथील आदीवेशनच्या दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री मधू बंगाराप्पा यांच्याशी भेट घेऊन खानापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील समस्या बाबत चर्चा केली.
यावेळी खानापूर तालुक्यात विविध शाळातुन शिक्षकाची पदे रिक्त आहेत.त्याच बरोबर अनेक शाळांच्या इमारती कोसळण्याच्या मार्गावर आहेत.अशा शाळा तात्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे. आदी विषयावर आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.
चर्चे दरम्यान सरकार याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी विधान परिषद सदस्य मुर्गेश निरानी यांची उपस्थिती होती.