संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहर क्लस्टर विभाग १४ वर्षाखालील क्रिडा स्पर्धेत खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मेडियम स्कूलच्या खेळांडुनी विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे.
मुलींच्या गटात: वैयक्तीक स्पर्धेत प्राजक्ता पाटील हिने हाडल्स स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि उंच उडी प्रथम क्रमांक ,अदिती गावडे लांब उडी प्रथम क्रमांक, १०० मीटर धावणे प्रथम ,सोनाली अनगोळकर हाडल्स व्दितीय व ४०० मीटर धावणे व्दितीय,सुष्टी गुंड्यापगोळ उंच उडी व्दितीय ,सीता गुरव शाॅट पूट व्दितीय क्रमांक पटकाविला.
सांघिक स्पर्धेत रिले मुलींच्या गटात व्दितीय ,
मुलांच्या गटात : मनिष पटेल उंच उडी तृतीय,अरहान कोल्हापूरी ४०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले.
विजयी स्पर्धेकाना क्रिडा शिक्षक श्री हलगेकर याचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
स्कूलच्या प्राचार्या सौ दिव्या नाडगौडा व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे. स्कूलचे चेअरमन ,सेक्रेटरी व संचालकानी विजयी खेळांडुचे कौतुक केले.
समर्थ स्कूलच्या खेळांडुचे खानापूर शहरासह तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.