#वर्ग खोल्याचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता.खानापूर ) येथील जेसीएफ शाळांच्या आवारातील उर्दू प्राथमिक शाळेच्या इमारतीवर सोमवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने आंब्याचे झाड एका वर्ग खोलीवर पडल्याने वर्ग खोलीचे छप्पर व भिंतीचे मोठे नुकसान झाले . वेळ बलवत्तर म्हणून जीवीत हानी झाली नाही.
सदर घटना शाळेच्या वेळेत झाली नाही.
मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे उर्दू शाळेचे विद्यार्थी व शिक्षक शाळेत हजर झाले .त्यावेळी आंब्याचे झाड कोसळल्याचे दृष्टीस पडले .
लागलीच सदर घटना नंदगड विभागाच्या वनखात्याला कळविण्यात आले. वनविभागाच्या कर्मचार्यानी घटनास्थळी धाव घेऊन झाडाच्या फांद्या माळ केल्या.
लागलीच बीईओ पी रामाप्पा याना घटनेची माहिती देताच बीईओ नी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व इमारतीचे नुकसान झाल्याची नोंद करून वर्गखोल्याच्या दुरूस्तीसाठी निधी मंजुर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पालक,शिक्षण प्रेमी व नागरीकानी वर्ग खोल्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली.