#गर्लगुंजीत प्राथमिक,माध्यमिक शिक्षण!
#गर्लगुंजीतील पहिली ज्यूडो स्पर्धक!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगु़ंजी ( ता खानापूर ) गावची सुकन्या ज्यूडो स्पर्धक रोहिणी पुढलिक पाटील हिने नुकताच बेळगाव येथील गांधीभवन येथे पहिल्यांदाच कर्नाटक राज्यस्तरीय ओपन ज्यूडो चॅपियणशीप स्पर्धा पार पडल्या.
या ज्यूडोस्पर्धेत भाग घेऊन ५७ किलो वजनी गटात सुर्वण पदाकाची मानकरी ठरली.
रोहिणी पाटील हिचे प्राथमिक शिक्षण गर्लगुंजी सरकारी प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत झाले .तर माध्यमिक शिक्षण माऊली गर्ल्स हायस्कूल मध्ये तर काॅलेज शिक्षण बेळगाव येथे होत असुन एका शेतकरी कुटूंबात जन्म घेऊन गर्लगुंजी गावात ज्यूडो खेळात पहिली खेळाडू म्हणून प्रसिध्दीस आली.
तिच्या यशाबद्दल खनापूर तालुक्यातुन तिचे अभिनंदन होत आहे.
खानापूर लायन्स क्लबच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.