संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व मराठी सीमाभागात पहिले राष्टपती पदक विजेते आदर्श शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब नारायण दळवी यांचा ३० जुलै हा जन्मदिन आहे.
आबासाहेब नारायण दवळी यांचा जन्म मणतुर्गा (ता.खानापूर ) येथे झाले. वडील नारायण दळवी हे सुध्दा शिक्षकी बरोबर बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीचे शाळा तपासणी अधिकारी असल्याने वडीलांच्या पावला पाऊल ठेवत. ते प्राथमिक शिक्षक झाले.
नागुर्डा (ता.खानापूर ) सारख्या गावात उच्च प्राथमिक शाळा व्हावी.यासाठी त्यानी प्रयत्न केले. तालुक्यातील अनेक शाळा मध्ये शिक्षक सेवा करत असताना ज्या गावात शिक्षक म्हणून रूज झाले.त्या गावाच्या सामाजिक ,शैक्षणिक कार्यात सदैव पुढे राहायचे.
एवढेच नव्हे तर शिक्षिका सेवा करून ते थांबले नाहीत. तर शिक्षकी पेशेत असताना ते उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून सर्वाना परिचित होते. त्याच बरोबर खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे चेअरमन म्हणून त्यानी काम केले आहे. त्याना विविध पुरस्काराबरोबर दि.५ सप्टेंबर २०१२ रोजी भारत सरकारच्यावतीने राष्ट्रपती पदक आदर्श पुरस्कार विज्ञान भवन दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रणव मुखर्जी आणि तत्कालिन केंद्रीय मनुष्यबळ मंत्री कपिल सिब्बल यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.शेवटी इदलहोंड (ता.खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत माॅडेल मुख्याध्यापक सेवा निवृत्त झाले.
त्याची पत्नी सौ.अरूंधती आबासाहेब दळवी या सुध्दा शिक्षिका होत्या.त्याची शिक्षिकेची सेवा खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील देगाव या शाळेतुन सुरूवात झाली त्यानंतर त्याची खानापूर तालुक्याच्या खेडोपाड्यात सेवा बजावली. त्यानी खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक सोसायटीचे चेअरमन पद भुषविले आहे. व मुख्याध्यापिका म्हणून गर्लगुंजी येथील प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेतुन सेवा निवृत्त झाल्या.
राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी यांचा एक मुलगा इंजनिअर प्रसादसिंह ,सुन उच्चशिक्षित सौ गायत्री व उच्चशिक्षित मुली जावई व नांतवंडे असा मोठा परिवार आहे.
यासर्वाच्यावतीने त्याना ७१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्याचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जावो! हीच ईश्वर चरणी प्रार्थना!