संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
घोटगाळी ( ता.खानापूर ) पी के पी एस सोसायटीचे चेअरमन व ग्राम पंचायतीला दोन वेळा निवडुन आलेले ग्राम पंचायत सदस्य डाॅ.रफिक हलशीकर याना बेडकिहाळ (ता.निपाणी ) ५व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय प्रेरणा गौरव प्रशस्ती २०२५ अंतरगत समाज रत्न गौरव पुरस्कार देऊन रविवारी दि.२० रोजी सन्मानित करण्यात आले आहे.
डाॅ. रफिक हलशीकर व्यवसायाने डाॅक्टर असले तरी समाज कार्यात सतत वाहुन घेतले असुन गोर गरीबाचा कैवारी अशी ख्याती आहे. सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात.
त्याना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल खानापूर तालुक्यातुन तसेच खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनच्यावतीने अभिनंदन होत आहे.