#खानापूर तालुक्यात सर्वाच्या परिचयाचे आदर्श हवालदार काद्रोळी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर शहरातील पोलिस स्टेशनचे क्राईम खात्याचे तालुक्यात सर्वाच्या परिचयाचे आदर्श हवालदार म्हणून ओळखणार्या जगदिश काद्रोळी याना बेळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.भीमाशंकर गुळेद यांच्याहस्ते बेळगाव येथे प्रशंसापत्र देऊन त्याना सन्मानित केले.
खानापूर तालु्क्यात क्राईम शाखेत कर्तव्यदक्ष हवालदार म्हणून सेवा बजावताना खानापूर तालुक्यात अनेक प्रकरणे सोडविण्यात त्यानी महत्वाची भूमिका घेत खानापूर तालुक्यासाठी चांगले योगदान दिले आहे. त्याच्या या कर्तव्य दक्ष कार्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.त्याबद्दल बेळगाव येथील एस पी कार्यालयात बेळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.भीमाशंकर गुळेद यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले .
त्याच्या या कार्याबद्दल व सन्मानाबदल खानापूर तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.