संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जंगली प्राण्यांचे हल्ले म्हणजे शेतकर्याना नविन नाही . मात्र या जंगली प्राण्यामुळे रामनगर (ता. जोयडा) येथील अस्वलाच्या हल्ल्यातुन बचावला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की रामनगर येथील शेतकरी मारूती माळेकर ( वय.५०) या शेतकर्यावर मंगळवारी दि.१५ रोजी संध्याकाळी शेतातुन येतातुन अचानक अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. अस्वलाच्या तावडीतुन सुटण्यासाठी आरडाओरड केली.तरीपण अस्वलाने शेतकर्याच्या डोक्यावर हल्ला केला .हातापायाला चावा घेत नखानी ओरबडत रक्तबंबाळ केले.
अशा परिस्थितीत ४ किलो मिटर अंतर चालत जाऊन घर गाठले . लागलीच त्याना बेळगावला उपचारासाठी पाठवुन उपचार करण्यात येत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी नानेगाळी शेतातील काम आटपून घरी येण्यासाठी रस्त्यावरून चालत येत होते. त्याचवेळी हचानक अस्वलाने हल्ला चढविला. त्यात तो रक्तबंबाळ झाला. ही घटना रामनगारात पसरताच नागरीकानी घटना स्थळी धाव घेतली.लागलीच प्राथमिक उपचारासाठी रामनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन त्याना लागलीच बेळगावला पाठविण्यात आले.