#गर्लगुंजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवृत्त सैनिक मारूती धामणेकर यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
भारतीय सेवा निवृत्त माजी सैनिक हा नेहमीच सैनिक असतो. कारण त्याने देशाची सेवा केलेली असते. इतर सेवेपेक्षा भारतीय सैनिकांची सेवा ही सर्व श्रेष्ठ सेवा आहे. अशा माजी भारतीय सैनिकाचा आदर देशातील प्रत्येक नागरीकाने केला पाहिजे. कारण माजी सैनिक हे नेहमीच सैनिक असतात. असे विचार गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव यल्लापा मेलगे यांनी निवृत्त सैनिक मारूती धामणेकर यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
सोमवारी दि १४ रोजी गर्लगुंजी (ता . खानापूर ) येथील माजी सैनिक स़घटनेच्या वतीने निवृत्त सैनिक मारूती धामणेकर यांचा सत्कार सोहळयाचे आायोजन करण्यात आले होते.
यावेळी गर्लगुंजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निव़ृत्त सैनिक बाबूराव यल्लापा मेलगे व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्याहस्ते २१ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावुन निवृत्त झालेल्या मारूती धामणेकर यांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते.
यावेळी सेवा निवृत्त माजी सैनिक मारूती धामणेकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.